बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मराठीतून परिपत्रके व कागदपत्रे द्यावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.
हा मोर्चा विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप करत मोर्चा रोखुन धरण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला पण उपस्थित कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत मोर्चाला मार्ग मोकळा करून दिला पण त्यानंतर मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवींसह ३१ जणांवर कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर पाचवे दिवाणी व जेएमएफसी न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, किरण गावडे, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, श्रीकांत मांडेकर, रवी साळुंखे, धनंजय पाटील, मदन बामणे, नेताजी जाधव, परशुराम ऊर्फ बंडू केरवाडकर, गजानन पाटील, संदीप चौगुले, दिगंबर काटकर, परेश शिंदे, विनायक सांबरेकर, हणमंत मजुकर, रामचंद्र कुद्रेमानीकर, विनायक पावशे, नागेश किल्लेकर, उदय नाईक, अनिल हेगडे, माधुरी हेगडे, संदीप मोरे, मल्हारी पावशे, चेतन पाटील, कृष्णा गुरव यांना जामीन मंजूर करण्यात आला.
यावेळी वकील महेश बिर्जे आणि रिचमॅन रिकी यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले.