Sunday , October 13 2024
Breaking News

इनरव्हील क्लबतर्फे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा

Spread the love

बेळगाव : सध्याच्या काळात ई – स्वरुपात म्हणजे ऑडिओ व्हिडिओद्वारे सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत. हे आधुनिक तंत्रज्ञान अधिक चांगल्याप्रकारे वापरता यावे व सदस्यांनी आपापले व्हिडिओ व्यवस्थित बनवावेत, यासाठी इनरव्हील क्लबतर्फे शुक्रवार दि. 20 ऑगस्ट रोजी मोबाईलद्वारे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये पस्तीसहून अधिक सदस्यांनी आवडीने भाग घेतला. टिळककवाडी येथील जी. जी. चिटणीस शाळेच्या सभागृहात कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करत हा कार्यक्रम पार पडला. सरकारी सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले, राजर्षि हायस्कूल शिनोळीचे शिक्षक रवी पाटील आणि लीलावती करगुप्पीकर हायस्कूल, अगसगा येथील शिक्षक युवराज पाटील या तंत्रस्नेही शिक्षकांनी वेगवेगळे ऍप्स वापरून, परिणामकारक व्हिडिओ कसे बनवायचे याच्या प्रात्यक्षिकासह जवळ जवळ अडीच तास प्रशिक्षण दिले. क्लबच्या इवेंट प्रमुख शिल्पा शहा यांनी स्वागत व ओळख करून दिली. क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी यांनी आधुनिक जगात आपण पुढे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान सर्वांनीच आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली असल्याचे सांगितले. डॉ. सुषमा शेट्टी यांनी वक्त्यांना भेटवस्तु देऊन स्वागत केले. डॉ. सविता कद्दू यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा शहा यांनी केले. कार्यशाळेत इनरक्लबच्या सदस्यांनी कुतूहल दाखवित भाग घेत कार्यशाळा यशस्वी केली.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *