Monday , September 21 2026
Breaking News

पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांचा श्रीमहालक्ष्मी ग्रुपच्यावतीने वाढदिवस साजरा

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे याचा वाढ दिवस तालुक्यातील खानापूर तोपिनकट्टी गावच्या श्रीमहालक्ष्मी ग्रुपच्यावतीने वाढदिवस श्रीमहालक्ष्मी ग्रुपच्या सभागृहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर होते.

यावेळी पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्याहस्ते केक कापण्यात आला. यावेळी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी कोरोना काळात तालुक्यातील जनतेची सेवा चांगल्या प्रकारे केली. एक तत्पर्य अधिकारी म्हणून सुरेश शिंगे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सुरक्षित आहे.
यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, लैला शुगर्सचे एम. डी. सदानंद पाटील, संचालक चांगापा निलजकर, यल्लापा तिरवीर, महादेव बांदिवडेकर, राजाराम हलगेकर, गुंडू पाखरे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी महादेव बांदिवडेकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *