बेळगाव : रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
बेळगावातील चन्नम्मा चौकात प्रगतीपर संघटनांच्या वतीने बंडखोर साहित्यिक डॉ. वाय. बी. हेम्मडी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारने नेमलेली रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याची मागणी निदर्शकांनी केली. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बोलताना बंडखोर साहित्यिक डॉ. वाय. बी. हेम्मडी म्हणाले, बरगुर रामचंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखालील पाठयपुस्तक सुधारणा समितीने तयार केलेली अभ्यासक्रमाची पुस्तके परिपूर्ण आहेत. देशातील वैविध्य टिकवून ठेवणारी, मुलांमध्ये देशभक्ती, राज्यभक्ती, कर्नाटकाची संस्कृती यांची मूल्ये रुजविणारी ती पुस्तके आहेत. तो कोणीही बदललेली नव्हती. परंतु शिक्षणतज्ज्ञ नव्हेच तर शिक्षणाचा गंधही नसलेल्या रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकांगी, एकमुखी निर्णय घेत प्रमुख साहित्यिकांचे लेखन सोडून एकाच समुदायाच्या लेखकांची निवड केली आहे. यातून ते शिकणार्या विद्यार्थ्यांच्या मनात सनातन संस्कृतीचे वीषबीज पेरण्यास निघाले आहेत, अशी बोचरी हेम्मडी यांनी टीका केली.
यानंतर रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करून बरगुर रामचंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समितीलाच मुदतवाढ द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत सरकारला देण्यात आले.
Check Also
ममता चिठ्ठीचे मरणोत्तर देहदान
Spread the love जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार बेळगाव : मूळच्या येळ्ळूर आणि सध्या समृद्धी कॉलनी …