बेळगाव : बेळगाव शहरातील बापट गल्ली येथे आत्ता असलेल्या मशिदीच्या ठिकाणी मूळ मंदिर होते. या संदर्भात योग्य माहिती जाणून घेऊन कारवाईसाठी पावले उचलावीत, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे अभय पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी या मुद्द्यासंदर्भात चर्चा केली. आपण जिल्हाधिकार्यांना आवश्यक अशी सर्व माहिती दिली आहे. तसेच याबाबत कारवाईसाठी सूचना केली आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकार्यांना याबाबत आपण एक आठवडाभरानंतर भेटणार आहोत. त्यानंतर पुढील पावले उचलण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशभरातील 36000 मशिदींच्या ठिकाणी मूळ मंदिरे असल्याचा अहवाल तयार केला आहे. यानुसार बेळगाव विभागात देखील आता मशिदी असलेल्या ठिकाणी मंदिरे होती. याचा योग्य शोध जिल्हा प्रशासनाने घ्यावा. तसेच बापट गल्ली या ठिकाणी आता असलेल्या मशिदीच्या जागी मूळ मंदिर होते. याबद्दल चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी यापूर्वी केली आहे.
