बेळगाव : महानगर पालिका सभागृहात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
फूटपाथवरील अतिक्रमण, यासह शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देणे, पिण्याचे पाणी यासह अनेक समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी प्रामुख्याने फुटपाथवरील अतिक्रमणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. यासह २४ तास पिण्याच्या पाण्यासंदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण करणे, कोणत्याही कारणास्तव विलंब होऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती कामे, ई–आस्तीच्या माध्यमातून मालमत्तेसंदर्भातील डिजिटल दाखले, यासह अनेक विषयांवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी पिण्याचे पाणी, स्वच्छता यासह नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांसंदर्भात माहिती दिली. पालिका उपायुक्ता भाग्यश्री हुग्गी यांच्यासह पालिकेचे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सभेला उपस्थिती दर्शविली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कमांड अँड कंट्रोल रूमला देखील भेट दिली. यावेळी येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांसंदर्भात माहिती घेऊन पाहणी केली. याचप्रमाणे रहदारी यंत्रणा, बससंचार व्यवस्था आदींसंदर्भात माहिती घेऊन सल्ला सूचना दिल्या.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …