
बेळगाव : वार्ड क्र. 50 मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांनी ग्रामदेवता मंगाई देवीची पूजा करून प्रचारास सुरुवात केली.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली. त्यांनी वार्डातील पंचांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. या भागातील रस्ते, गटारी आदि प्रकारची विकासकामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच जनतेने आपल्या पाठीशी उभे राहून निवडून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta
