Saturday , December 14 2024
Breaking News

डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील : एस. डी. लाड

Spread the love

चंदगड (रवी पाटील) : कै. शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील सर ही एक व्यक्ती नसून विचार आहे तो मरू देणार नाही. सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत व त्यामुळे मरगळ आलेली असून ती दूर करण्याचा प्रयत्न डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंच नक्कीच करेल अशी ग्वाही मार्गदर्शक एस. डी. लाड यांनी दिली.

चंदगड तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय व म. भु. तुपारे ज्युनिअर कॉलेज कारवे येथे डी. बी. पाटील विचारमंचाची शाखा स्थापन करण्यात आली.

कै. डी. बी. पाटील सरांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर त्यांनी ध्यास घेतला. अशा या थोर शिक्षण तज्ञांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी श्री. डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंच कोल्हापूर मार्फत चंदगड तालुक्यात सहविचार मंचाची शाखा स्थापना करण्यात आली. तालुका अध्यक्ष म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. आय. पाटील यांची निवड करण्यात आली.

या शैक्षणिक मंचामार्फत शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न मंचाच्या असेल यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व शिपाई पर्यंत या शिक्षण क्षेत्रातील ज्या आडीअडचणी, प्रश्न असतील ते न्यायिक मार्गाने सोडण्याचा हा मंच प्रामाणिक प्रयत्न करेल. तसेच प्रसंगी अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचा निर्धार असल्याचा या मंचाच्यावतीने बी. जी. काटे यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शक एस. डी. लाड, बी. जी. काटे, के. बी. पवार, मंचचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष डी. एस. घुगरे, राज्य मुख्याध्यापक महामंडळ सदस्य बी. बी. पाटील, सदस्य रंगराव तोरस्कर, डॉ. ए. एम. पाटील, जयसिंग पवार, दत्तात्रय जाधव, के. के. पाटील, ए. एस. रामाणे, बी. एस. कांबळे, प्राचार्य एम. एम. गावडे यासह आदी मान्यवर या मंचावरती उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य एम. एम. गावडे यांच्याहस्ते उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर. आय. पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मंचाचा उद्देश सचिव श्री. आर. वाय. पाटील यांनी स्पष्ट करून यापुढे शाळांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शाखा स्थापन करून चांगली बांधणी केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी
रंगराव तोरस्कर, के. के. पाटील, बी. जी. काटे, डी. एस. पवार, मंचचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार व बी. बी. पाटील आदी मान्यवरांनी मंचाची भूमिका व्यक्त केली. प्राचार्य ए. एस. रामाने, माजी प्राचार्य बी. एस. कांबळे, मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव, प्राचार्य डी. एस. घुगरे, शिवाजी चौगुले, संभाजी पाटील, मुख्याध्यापक पाळेकरसर, मुख्याध्यापक गायकवाडसर, माजी मुख्याध्यापक के. के. पाटील, मुख्याध्यापक जे. एम. पोवार, माजी मुख्याध्यापक के. बी. पोवार, तालुक्यातील
आजी -माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य वाय. व्ही. कांबळे यांनी केले तर आभार माजी प्राचार्य शांताराम व्ही. गुरबे सर यांनी मानले.

——————–
डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंच हा शिक्षकांना सक्षम करण्यासाठी असून उपक्रमशील शिक्षक मंडळींच्या पंखात बळ मिळाले पाहिजे आणि शैक्षणिक क्रांतीतून समाजिक परिवर्तन करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. या उदात हेतूने सर्व जिल्हाभर शैक्षणिक मंचाच्या महिनाभरात शाखा स्थापना केल्या जाणार आहेत.
मंचचे सचिव आर. वाय. पाटील

About Belgaum Varta

Check Also

कृष्णा नदीच्या पुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू

Spread the love  सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *