Sunday , September 20 2026
Breaking News

वार्ड क्र. 50 मधील समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी पाटील यांची प्रचारात आघाडी

Spread the love

बेळगाव : वार्ड क्र. 50 मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांच्या प्रचारासाठी कारभार गल्ली पिंपळकट्टा गणपती-हनुमान मंदिरात ज्येष्ठ पंच यल्लाप्पा केदारी कणबरकर यांच्या हस्ते पूजा करून प्रचारास सुरुवात केली.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना वाढता पाठींबा मिळत आहे. त्यांनी कारभार गल्लीतील सुरेश जोतिबा रेडेकर, दिलीप यल्लोजीराव नाईक, शशिकांत महादेव धामणेकर, बाजीराव साताप्पा मन्नूरकर,  नारायण इराप्पा जुवेकर आदि ज्येष्ठ पंचांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
जनतेने समितीच्या अधिकृत उमेदवाराच्या खंबीर उभे राहून निवडून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *