बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या माध्यमातून समर्थ नगर येथील श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे चिकुनगुनिया, डेंग्यूवरील होमिओपॅथिक लसीकरण करण्यात आले.
सतत १४ वर्षे हा लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून रविवारी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्री ब्रम्हदेव पूजनाने झाली. डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्याहस्ते पूजन करून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. या रोगावर कसे नियंत्रण मिळविता येते, यापासून बचावासाठी काय करावे तसेच या रोगाचा इलाज कशाप्रकारे होतो याबद्दल या लसीकरण शिबिरात माहिती देण्यात आली. बालचमूंसह महिला, युवक आणि सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या लसीकरणाचा लाभ घेतला.