बेळगाव : सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते दहावी वार्षिक परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले.
यावेळी सतीश जारकीहोळी फौंडेशनचे अध्यक्ष सुभाष होणमनी, मलगौडा पाटील, सुधीर पावले, सहित विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते.
