Saturday , July 13 2024
Breaking News

गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे उद्घाटन

Spread the love

बेळगाव : गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे दि. 5 जून रोजी उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व शिक्षण महर्षी श्री. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते. ग्रामीण भागातील लोकप्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू एमएलसी श्री. चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. त्याचप्रमाणे येथील नागरिकांनी ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनी याला लगत रस्त्याचे डांबरीकरण, विद्युतीकरण व कचरा उचलणे इत्यादी समस्यांचे स्वत: परीक्षण करून शक्य तितक्या लवकर ही बाब श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निदर्शनास आणून लवकरात लवकर येथील रहिवाशांच्या सर्व समस्या त्वरित सोडवण्यात येतील अशी ग्वाही दिली व तसे रहिवाशांनी दिलेला लेखी अर्ज स्वीकारला. याप्रसंगी येथील रहिवाशांनी त्यांचे यथोचित शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधुन लोकप्रिय जनसेवा संस्था व संस्थेचे अध्यक्ष श्री. गजानन साबण्णावर आमच्या अत्यंत निकटवर्तीय व गेली तीस वर्ष त्यांच्या कार्यास सतत प्रोत्साहन देणारे माजी आमदार व लोकप्रिय नेते श्रीमान रमेश कुडची यांनी विद्यमान आमदार श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी आजगत जात, धर्म, भाषा, यांच्याही पलीकडे जाऊन ग्रामीण भागामध्ये जो विकास केला आहे त्याची लोकांनी जान ठेवावी असे ते म्हणाले. तसेच सतत कार्यमग्न असणारे श्री. गजानन साबण्णावर यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाची ओळख उपस्थित लोकांना करून दिली.
श्री. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते पर्यावरण दिनाच्या निमित्त वृक्षारोपण करण्यात आले व त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास गौरव अतिथी म्हणून उपस्थित समाजसेवक श्री. मल्लेश चौगुले, येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. बाळासाहेब चोपडे, बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीमती प्रेमा रमेश हिरोजी, सदस्य दिनेश लोहार व इतर मान्यवर यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्मा व गणेश कॉलनी येथील नागरिक व विशेष परिश्रम घेतलेले श्री. प्रकाश चौगुले, श्री. राजाराम पाटील, श्री. ज्योतिबा पाटील, श्री. युवराज फडके, श्री. भाऊराव पाटील, श्री. उत्तम पाटील, श्री. ज्योतिबा खांडेकर, श्रीमती शोभा देसाई, श्री. जॉर्ज अरळीकट्टी, कुमार विश्वास साबणावर, श्री. बसवराज जंगम, श्री. अर्जुन रेडेकर, श्री. केंपय्या हिरेमठ, श्री. हिंडलगेकर, श्रीमती दया बाबर, श्रीमती प्रभावती गदाग, श्रीमती लवरा अरळीकट्टी, श्रीमती महादेवी चौगुले इतर अनेक नागरिकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित प्रतिष्ठित नागरिक श्री. बाळासाहेब चोपडे यांनी रस्ता डागडुजी व डांबरीकरण याकरिता शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल येथील ज्येष्ठ नागरिक श्री. विष्णू रामा पाटील यांचेही यथोचित सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती विद्या पाटील, श्रीमती सरिता पाटील, श्रीमती रेणुका पाटील, श्रीमती माया पाटील व श्रीमती संध्या फडके यांच्या सुमधुर प्रार्थनेने झाली. लोकप्रिय जनसेवा संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती भारती साबण्णावर यांनी कार्यक्रमाची सांगता केली व संस्थेचे अध्यक्ष श्री. गजाननराव साबण्णावर यांनी येथील रहिवाशांच्या अडचणी व आजगत एकत्रपणे संघर्ष करत आजच्या कार्यक्रम पर्यंतचा प्रवास इत्यंभूत उपस्थित मान्यवरांना निदर्शनास आणून दिला व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

About Belgaum Varta

Check Also

पीओपी गणेशमूर्ती बंदीचा आदेश बेळगावात नको; गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सवानंतर पीओपीच्या गणेश मूर्त्या नद्यामध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे नद्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *