बेळगाव : कडोली येथील श्री कलमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामकाजासाठी आज विधिवत भूमिपूजन पार पडले. कडोली येथील अत्यंत जागृत ग्राम दैवत श्री कलमेश्वर मंदिराच्या शेजारील सुमारे आठसे ते नवसे वर्षापेक्षाही पुरातन जिर्ण भरमदेव मंदिराच्या सभोवती फर्ची फ्लेवर्स घातल्याने जमिनीची उंची वाढली असून मंदिर जमिनीच्या खाली झाल्याने पावसाचे पाणी मंदिरामध्ये शिरत असल्याने मंदिर बांधणे आवश्यकच होते. यामुळे सध्या हनुमान नगर बेळगाव येथील रहिवाशी व मूळचे कडोलीचेच रहिवाशी व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असलेल्या एका भक्ताने नाव न जाहिर करण्याच्या अटीवर पाच लाख रुपयामध्ये स्वत: एकटेच मंदिर बांधण्याचा संकल्प करुन आपला धनादेश देवस्थान पंच कमिटीकडे सुपूर्द केला असून आज देवस्थानी पंच कमिटी, हक्कदार पंच कमिटी, पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच पुरोहीतांच्या होमहवन व मंत्रोपचाराने विधिवत पूजा करण्यात आली असून लवकरच मंदिर जिर्णोद्धाराच्या कार्यालाही प्रारंभ होणार आहे. सौ. व श्री. शेखर पट्टणशेट्टी दाम्पत्यांतर्फे पूजन तर श्री शंकरय्या हिरेमठ स्वामी बेळगाव व श्री मृत्युंजय स्वामीजी शिवपुजीमठ काकती यांनी पौरोहित्य करतांना शात्रशुद्ध मंत्रोपचाराने होमहवन करुन पूजाविधी पार पाडली. तर मूळचे कडोलीचेच रहिवाशी सद्या कोल्हापूर गगनगिरी आश्रम येथे वास्तव्यास असणारे बाळगेरी महाराज यांचेही कार्यक्रमाला योगायोगानेच उपस्थिती लाभली. तर याप्रसंगी देवस्की पं. कमिटी अध्यक्ष बाळु रुटकुटे, माजी देवस्की कमिटी अध्यक्ष व विद्यमान सदस्य धनंजय कटांबले, सदस्य दिपक मरगाळे, सदस्य कल्लाप्पा पवार, सदस्य लक्ष्मण कुट्रे, सदस्य अशोक कणबरकर, सदस्य शंकर लोहार, सदस्य कल्लाप्पा शिंगे, सदस्य कल्लाप्पा सनदी व सदस्य नानाजी पाटील तर देवध्यानी हक्कदार कमिटी अध्यक्ष मधु पाटील, हक्कदार कमिटी सेक्रेटरी कल्लाप्पा चौगुले, हक्कदार कमिटी सदस्य सुभाष धायगोंडे व नामदेव रुटकुटे आणी पुजारी चिदंबर पट्टणशेट्टी, बाबु देसाई, अनंत सुतार व ग्रामस्थ शंकरगौडा पाटील, केदारी पाटील, नारायण चौगुले, शिवाजी रुटकुटे आदी उपस्थित होते.
