Saturday , June 14 2025
Breaking News

विधान परिषदेसाठी बेळगावात मतदान

Spread the love

बेळगाव : विधान परिषदेच्या वायव्य कर्नाटक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी बेळगावात मतदानाला सुरुवात झाली आहे. बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर यांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स अवलंब करण्यात आलेला आहे. या मतदान केंद्र केंद्रावर सोशल डिस्टन्सने मतदान सुरू असून मार्किंग देखील करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच पर्यंत हे मतदान होणार आहे.
कर्नाटकातल्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बेळगाव, बागलकोट आणि विजापूर हे तीन जिल्हे येतात. शिक्षक मतदारसंघात भाजपकडून अरुण शहापूर, काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार बन्नूर यांच्यात तिरंगी लढत आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून हनुमंत निराणी आणि काँग्रेसकडून सुनील संक हे उमेदवार आहेत आणि यांच्यातच दुरंगी लढत होत आहे.
बेळगाव जिल्ह्यात 95, बागलकोट जिल्ह्यात 48 आणि विजापूर जिल्ह्यामध्ये 47 अश्या 190 मत पेट्या तयार करण्यात आले आहेत. शिक्षक मतदारसंघात 25388 तर पदवीधर मतदार संघात 99598 मतदार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतलेल्या प्रतीक जोशी यांनी संपूर्ण कुटुंब गमावले

Spread the love  बेळगाव : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात बेळगावमधील केएलईचा माजी विद्यार्थी प्रतीक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *