Wednesday , July 24 2024
Breaking News

राहुल गांधी ‘ईडीं कार्यालयाकडे रवाना, प्रियांका गांधीही ‘ईडी’विराेधात रस्त्यावर

Spread the love

दिल्‍ली : नॅशनल हेरॉल्‍ड प्रकरणी आज काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांची सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. याविरोधात आज देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडून ‘ईडी’ कारवाईविरोधात निदर्शने करण्‍यात आली.
दिल्‍लीत प्रियांका गांधीही रत्‍यावर उतरल्‍या असून राहुल गांधीसह ईडी कार्यलयाकडे रवाना झाल्‍या आहेत. दिल्‍लीत मान सिंह रोडवर काँग्रेस कार्यकर्ते एकवटले. त्‍यांनी ईडीविरोधात निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी तत्‍काळ त्‍यांना ताब्‍यात घेतले आहे. या आंदोलनावेळी पोलिसांचाही फौजफाटा तैनात करणया आला आहे.

काँग्रेस झुकणार नाही
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आमचे काम आंदोलन करणे आहे, त्यांना 144 लावून आम्हाला रोखायचे असेल तर थांबा. हे राजकीय नाही, हे लोक सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते काँग्रेसला झुकवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण काँग्रेस झुकणार नाही. काँग्रेस लढत राहील आणि उभे राहील, असे खर्गे म्हणाले.
या वेळी नाना पटोले म्‍हणाले, प्रियांका गांधी ॲक्‍शन मोडमध्ये असून गांधी कुंटुबियांचे देशासाठी मोठे योगदान आहे, हे विसरून चालणार नाही. मात्र आता गांधी कुंटुबियांच्या बदनामीचा प्रयत्‍न केला जात आहे, असे नाना पटोले म्‍हणाले.

ईडीकडून राहुल गांधींची चौकशी सुरू
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. यावेळी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक त्यांची चौकशी करणार आहे. त्याचवेळी सुरक्षेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना एक किलोमीटरवर थांबवण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अलमट्टीतून १ लाख क्युसेक विसर्ग सुरु; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Spread the love  सांगली : सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *