बेळगाव : बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील भगतसिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक के. व्ही. चोपडे हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
कंत्राटदार शिवाजी अतिवाडकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ए. ए. घोरपडे, प्राचार्य विक्रम पाटील, डी. बी. पाटील शिवाजी राक्षे, मल्लप्पा सांबरेकर, शंकर तरळे, गोपाळ कातकर, निवृत्त मुख्याध्यापक पी. के. तरळे उपस्थित होते. एस. वाय. संभाजीचे यांनी प्रास्ताविक केले. निवृत्त मुख्याध्यापक दांपत्याचा शाळेतर्फे व विविध संस्था युवक मंडळे, भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक चोपडे यांच्या कार्यावर आधारित अनेकांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी गजानन घुग्रेटकर, आनंद तुडयेकर, मल्लप्पा लोहार, माधवी तरळे आदी उपस्थित होते.