Monday , April 20 2026
Breaking News

‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

Spread the love

बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजहंसगड (येळ्ळूर गड) परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
ऑपरेशन मदत, इनरव्हील क्लब, मजदूर नवनिर्माण संघ, वनविभाग सोशल फाॅरेस्ट्री व सुळगे (येळ्ळूर) ग्रामपंचायत यांच्यावतीने राजहंसगड व जांबोटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जांभुळ, सीताफळ, चिंच, चाफा, करंज, सुबाभूळ, आंबा, वड, पिंपळ व उंबर अशा स्थानिक प्रजातीची रोपे लावण्यात आली.
यावेळी सुषमा शेट्टी, डाॅ. सविता कद्दू, लता कित्तुर, सुनिता हणमशेट, ममता जैन, स्वाती कुलकर्णी, सपना काजगर, प्रशांत बिर्जे, अनिकेत पाटील, ओमकार पाटील, परशराम रिक्षामामा व राहुल पाटील उपस्थित होते.
या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला संघटनेचे कार्यकर्ते कार्तिक शहा, पद्मप्रसाद हुली, बबन कुगजी, डीआरएफओ प्रशांत. जैन, सुळगे (ये) पीडिओ बी. आर. ताशिलदार, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महिला कार्यकर्त्यांनी पावसाळी धुक्यामध्ये राजहंस गडावर फेरफटका मारून निसर्गाचा आनंद घेतला.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *