Saturday , December 7 2024
Breaking News

प्रकाश हुक्केरी यांचा 5055 मतांनी विजय

Spread the love

बेळगाव : विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी घेत काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी 5055 मतांनी विजय संपादन केला.
प्रकाश हुक्केरी यांना 11460 मते तर भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांना 6405 मते पडली.
त्यांनी धुळ चारल्यामुळे आता शिक्षकांच्या समस्या मांडणारा नवा लोकप्रतिनिधी अर्थात आमदार बेळगावच्या शिक्षकांना मिळाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रकाश हुक्केरी यांनी यापूर्वी पाच वेळा आमदार, एकदा खासदार आणि तीन वेळा मंत्रीपद भूषविताना अत्यंत प्रभावी कार्य केले आहे. राजकारणात आपला असा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश हुक्केरी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात सदलगा -एकसंबा जिल्हा पंचायत सदस्य या नात्याने केली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवून ते विधान परिषदेमध्ये निवडून गेले. पुढे पाच वेळा आमदार होऊन त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली. त्यानंतर एकदा 2014 साली ते खासदार म्हणून निवडून आले. दिल्ली दरबारी लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रकाश हुक्केरी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात तीन वेळा मंत्री देखील झाले. लोकसभेच्या निवडणुकीत गेल्या 2018 साली त्यांना अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
बेळगाव जिल्ह्यातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ कार्यक्षम नेता म्हणून आज त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. एकेकाळी बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्रीपद भूषविताना अनेक विकास कामे करण्याबरोबरच बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेची अर्थात बीम्सची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि आता पुन्हा विधान परिषद असा प्रवास करणाऱ्या प्रकाश हुक्केरी यांचे विशेष म्हणजे ते संघ संस्थांसह गरजूंना आणि विविध समाजांच्या कार्यक्रमांना सढळ हस्ते मदत करण्यात आघाडीवर असतात. आपल्या मतदारसंघात विभिन्न विकास कामे करण्याबरोबरच सामाजिक योगदान मोठे असल्यामुळे हुकेरी जनमाणसात लोकप्रिय आहेत.

About Belgaum Varta

Check Also

हिवाळी अधिवेशनावर 580 सीसीटीव्ही तर 10 ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

Spread the love    बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *