खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मण्णूर येथील शिक्षण खात्याच्या डाएट ट्रेनिग सेंटर कार्यालयाला एक लाख रूपये किमतीची विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाची पुस्तके डाएटचे प्राचार्य श्री. सिंदुर यांच्याकडे सुपूर्द केली.
त्यानंतर खानापूर येथील कार्यालयात साधेपणाने वाढदिवसाचे आयोजन केले.
यावेळी ऍड. एच. एन. देसाई, सोनाली सरनोबत, दिलीप पवार, रमेश पाटील, नगरपंचायत स्थायीकमिटी अध्यक्ष प्रकाश बैलुरकर, नगरसेवक नारायण मयेकर, नारायण ओगले, पंडित ओगले, राजू कांबळे, विनायक महालतकर आदी नेते उपस्थित होते.
प्रारंभी रमेश पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी खानापूर तालुका क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी केक कापून साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी तालुक्यात पाचशे फगवे झेंडे देऊ केले. तसेच तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात अभिलाष देसाई यांना शुभेच्छा देणारी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार रमेश पाटील यांनी मानले.
