बेळगाव : सर्वर डाऊन अभावी गावातील बँक ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे यासंदर्भात, येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी येळ्ळूर युनियन बँक व्यवस्थापक कोमल जगदाळे यांची युनियन बॅंकेमध्ये होणारी गैरसोय दूर करण्याबाबतीत चर्चा केली.
यावेळी बोलताना व्यवस्थापक जगदाळे म्हणाल्या, येळ्ळूरमध्ये B,S,N,L चे नेटवर्क नसल्यामुळे पासबुक इंट्री व इतर कामात व्यत्यय निर्माण होत असल्याचे सांगितले. अध्यक्ष सतीश पाटील यांनी अन्य नेटवर्क सेवा ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेने उपलब्ध करून घ्यावी अशी सूचना केली. युनियन बॅंकेचे विभाग प्रांताधिकारी विठ्ठल बनशंकरी यांनी बँकेमध्ये नेटवर्क गैरसोय तसेच बँकेत येणारे ग्राहक, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना पेंन्शन त्याचबरोबर अन्य कामासंदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. व्यवस्थापक जगदाळे यांनी ग्राहकांची गैरसोय दूर केली जाईल बँकेकडून ग्राहकांना पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, रमेश मेणसे व जोतिबा चौगुले उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta