बेळगाव : डिप्लोमा प्रथम वर्ग सेमिस्टरचे 2022-23 या शैक्षणिक वर्षात पहिल्या सेमिस्टरचे वर्ग चालविण्यासाठी तात्पुरते वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व डिप्लोमा महाविद्यालयांनी नव्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमाखाली नमूद केलेल्या माहितीनुसार सुरवात करावी, अशी सूचना तांत्रिक शिक्षण खात्याच्या सहसचिवांनी केली आहे. पहिल्या सेमिस्टरचे वर्ग व पार्टटाइम पहिल्या सेमिस्टरचे वर्ग 23 जुन पासून सुरू करावेत तसेच या विद्यार्थ्यांना नियमानुसार सी-20 अभ्यासक्रमात सुचविण्यात आल्याप्रमाणे पाहिले 15 दिवस इंडकशन प्रोग्रॅम घेऊन त्यानंतर वर्ग सुरू करावेत. राज्यातील सर्व तांत्रिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याची दाखल घेऊन वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून निर्धारित वेळेत पूर्ण करावा. तिसऱ्या आणि पाचव्या समिस्टरचे वर्ग व पार्टटाईम दुसऱ्या, चौथ्या व सहाव्या सेमिस्टरचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे तांत्रिक शिक्षण खात्याच्या महासचिवानी सांगितले आहे.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …