बेळगाव : मराठी परिपत्रकासाठी 27 जूनला होणाऱ्या मोर्चाबाबत जागृतीसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी (ता.20) रोजी दुपारी दोनला तुकाराम महाराज संस्कृतीक भवन, ओरिएंटल स्कूल येथे होणार आहे. मराठीतून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याने मध्यवर्ती समितीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला समिती कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवहान तालुका समिती चिटणीस एम. जी. पाटील यांनी केले आहे.
