Wednesday , May 21 2025
Breaking News

मराठा मंडळ कॉलेजचा 64 टक्के निकाल

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजचा यंदाचा पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल 64 टक्के लागला असून या कॉलेजमधील 533 पैकी 338 विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 38 विद्यार्थी हे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजमधील आदिती एस. पाटील ही 576 गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम आली असून प्राची पी. पाटील (574 गुण) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. मृणालिनी कदम व मानसी पवार या दोघी प्रत्येकी 556 गुण मिळवून संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजमधील टॉपर्स पुढील प्रमाणे आहेत. वैष्णवी पाटील (562 गुण), मानसी पवार (556), मृणाली कदम (556), अश्विनी आर. (554), किरण गुरव (550), ऋतुजा मोरे (548), वैशाली वनपुरी (548), भूमिका राहुल (545), शिवानी पाटील (545), सुहानी आनंदाचे (545), प्रवीण धामणेकर (543), रसिका बांदिवडेकर (543), स्वाती पाटील (543), राधिका कणबर्गी (741), निलेश भातकांडे (512) आणि संगीता तारीहाळकर (511 गुण).
या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजेश्री नागराजू यांचे प्रोत्साहन तसेच कॉलेजचे प्राचार्य एस. पाटील आणि प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेतील यशाबद्दल या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ठळकवाडी हायस्कूलच्या 73 बॅचचा स्नेहमेळावा…..

Spread the love  बेळगाव : 1973 मध्ये एस‌्.एस्.एल् सी. उत्तीर्ण झालेल्या ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा तिसरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *