Friday , December 8 2023
Breaking News

राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघे युवक ठार

Spread the love

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी घटनास्थळी ठार झाले आहेत. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्या शेजारी बुधवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

श्रीनाथ दिगंबर पवार (वय 21) रा. चव्हाट गल्ली बेळगाव आणि रचित रंजन डूमावत (वय 21) सदाशिवनगर बेळगाव अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्रीनाथ आणि रचित हे दोघेही रात्री धाब्यावर जेवण करून बेळगावकडे परतत होते. त्यावेळी पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात दोघांनाही इतकी गंभीर दुखापत झाली घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. रहदारी उत्तर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. दोघेही मयत युवक चांगले मित्र होते. रात्री जेवणासाठी ते महामार्गावरील धाब्यावर गेले होते. लिंगराज कॉलेजमध्ये बी. कॉमच्या अंतिम वर्षात ते शिकत होते.

ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर अपघातात दोन्ही युवक अचानकपणे मयत झाल्याने चव्हाट गल्ली आणि सदाशिवनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. श्रीनाथ पवार हा चव्हाट गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक आणि मराठा को-ऑप. बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार यांचा चिरंजीव होता.

गुरुवारी सकाळी अकरा वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमीत श्रीनाथवर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

टिप्पर -कारचा भीषण अपघात; दोघांचा जळून मृत्यू

Spread the love  बेळगाव : देवगिरी ते बंबरगा गावादरम्यानच्या चौकात टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *