Friday , December 8 2023
Breaking News

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 23 गावामध्ये शंभर टक्के लसीकरण : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यशस्वी

Spread the love

बेळगांव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 23 गावांमध्ये शंभर टक्के पहिली लस पूर्ण झाले असून त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यशस्वी झाल्या आहेत.
बेळगुंदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील बेळगुंदी, बोकनूर, बेळवट्टी, बडस, बकनूर, गणेशपुर, ज्योतीनगर, सोनोली, येळेबैल, राकसकोप, धामणे व उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्याप्तीतील कोनेवाडी, बेकिनकेरी, बसुर्ते, कलेहोळ, आंबेवाडी, सुळगा, कुद्रेमनी, मुतगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील सांबरा, हंदीगनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील अलतगा, बेंडीगेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील बेंडीगेरी, हिरेबागेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्याप्तीतील कलारकोप्प, मास्तमरडी आदी गावामध्ये 100 टक्के पहिले डोस लसीकरण झाले आहे.
इतर गावामध्ये देखील 90 टक्केहुन अधिक लसीकरण झाले आहे. त्या सर्व गावामध्ये आणखीन एक दोन आठवड्यात संपूर्ण लसीकरण करण्याचे ध्येय हेब्बाळकर यांचे आहे.
तसेच मतदारसंघात दुसरे डोस देखील 26 टक्केहुन अधिक झाले आहे. 84 दिवस पूर्ण झाल्यानंतर सर्वांना दुसरे डोस लसीकरण देण्यात येईल. मतदारसंघात 100 टक्के लसीकरण करण्याचे धेय समोर ठेऊन अभियान राबवित असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर, यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची टीम रचना केली आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. मस्तीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य खात्याचे कर्मचाऱ्यांचे सहकार्य व सहयोगाने जिल्ह्यात अन्यत्र न मिळालेले मोठे यश आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मिळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

टिप्पर -कारचा भीषण अपघात; दोघांचा जळून मृत्यू

Spread the love  बेळगाव : देवगिरी ते बंबरगा गावादरम्यानच्या चौकात टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *