Thursday , June 4 2026
Breaking News

किरण जाधव यांनी दिला असहाय्य आजारी वृद्धाला मदतीचा हात!

Spread the love

बेळगाव : असहाय्य आजारी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका वृद्ध इसमाला भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी मदतीचा हात देऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडले असता गुडशेड रोड रस्त्यावर एका ठिकाणी एक वृद्ध इसम असहाय्य अवस्थेत पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
जाधव यांनी त्या इसमानजीक जाऊन त्याची विचारपूस केली असता तो सर्दी तापाने आजारी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्याने लागलीच बीम्स हॉस्पिटलला फोन करून रुग्णवाहिका मागून घेतली तसेच त्या रुग्णवाहिकेतून त्या वृद्धाची हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवानगी केली.

बीम्स हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी देखील किरण जाधव यांना संबंधित वृद्धावर उपचार करून व्यवस्थित काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे. आपल्या उपचाराची व्यवस्था केल्याबद्दल तो वृद्ध सध्या किरण जाधव यांना दुवा देत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *