बेळगाव : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडी यांनी बेळगावच्या श्री ज्योतिबा देवस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांचा बेळगावातील चव्हाट गल्ली ज्योतिबा मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला. बेळगावातील ज्योतिबा मंदिराचे सागवान नवरंग लाकडी गाभाऱ्याचे कामाचे कौतुक करत बेळगावची ज्योतिबा सासनकाठी यंदाच्या वर्षी ज्योतिबा यात्रेत दिलेली भेट शिस्तबद्ध आयोजनाची आठवण करून दिली. बेळगावच्या जोतिबा भक्तांनी दरवर्षी यात्रेत सहभागी होण्याची परंपरा जपल्याबद्दल प्रशंसा केली. सीमाभागातील काही देवस्थाने मंदिरांचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत समावेश असल्याचे सांगितले. यावेळी अनगोळ येथील श्री कलावती देवी हरी मंदिरालाही भेट दिली.
बेळगाव ज्योतिबा मंदिराच्या वतीने वकील अमर येळ्ळूरकर आणि प्रा. आनंद आपटेकर यांनी शिवराज नायकवाडी यांना बेळगावच्या मंदिराबद्दल माहिती दिली. यावेळी चव्हाट गल्लीतील सुनील जाधव, जयवंत काकतीकर, सुरेश तारिहाळ, नितीन राजगोळकर, भरत कागे आदी ज्योतिबा भक्त उपस्थित होते.
