Monday , April 20 2026
Breaking News

मंडोळी हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

Spread the love

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूल, मंडोळी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा नुकताच खेळीमेळीत उत्साहाने पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डी. एल. आंबेवाडीकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक जी. पी. मिसाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बालकांची जबाबदारी व पालकांची कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे मार्केट यार्ड येथील अडत व्यापारी राजू विश्वासराव हंगिरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे दिपप्रज्वलन हंगिरकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विलास अध्यापक, डी. एल. आंबेवाडीकर, एम. के. पाटील, यल्लाप्पा कणबरकर व पुंडलिक असोगेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी सन 2021 -22 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिल्या दहा क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे राजू हंगिरकर, सौ. पुनम व रामलिंग बेळगावकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे दिली. यल्लाप्पा कणबरकर यांनी 2022 -23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 3000, 2000 व 1000 रुपयांची बक्षिसे जाहीर केली. वर्गशिक्षक पी. पी. गोरल व के. पी. गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना थोरामोठ्यांचे आदर्श समोर ठेवून जिद्द, चिकाटी व सातत्य ठेवून अथक परिश्रम घेतल्यास विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठता येते, असे सांगितले.
प्रमुख पाहुणे विलास अध्यापक यांनी पालकांना त्यांच्या पाल्ल्या विषयीच्या जबाबदारीची जाणीव करून देत विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून येणाऱ्या दहावीच्या अंतिम परीक्षेत चांगले गुण संपादन करण्याचे आवाहन केले. एम. के. पाटील यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एन. बेळगुंदकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणानंतर सहशिक्षिका सौ. सी. एस. चव्हाण त्यांचे आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *