बेळगाव : टिळकवाडी येथील बालिका आदर्श शाळेच्या सहशिक्षिका सुजाता बापूसाहेब देसाई यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना चिकोडी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, गुलबर्गा जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णावर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, कोल्हापूरचे उद्योगपती सुरेश दादा पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी जिल्हा कमांडर अरविंद घट्टी यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बालिका आदर्श शाळेच्या शिक्षिका सौ. सुजाता देसाई यांचा शाल श्रीफळ, भगवाफेटा, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उचगांव देसाई भाऊबंद कमिटीतर्फे व मराठा संस्कृती संवर्धन बेळगाव यांच्यावतीनेही सौ. देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
