Sunday , September 20 2026
Breaking News

सारस्वत बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विकास कलघटगी यांचा अर्ज दाखल

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी शेड्यूल्ड बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस्वत बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते विकास रत्नाकर कलघटगी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बँकेच्या संचालक मंडळामध्ये महाराष्ट्र बाहेरील संचालक पदासाठी रिक्त असणार्‍या दोन जागांपैकी एका जागेसाठी विकास कलघटगी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. बँकेच्या मतदारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.

विकास कलघटगी यांनी नुकतीच बँकेचे विद्यमान चेअरमन गौतम ठाकूर यांची भेट घेतली. विकास कलघटगी यांनी यापूर्वी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचे अध्यक्ष म्हणून व्यापक कार्य केले आहे. तसेच बेळगाव पायोनियर बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी कार्य केले आहे. विकास कलघटगी यांचे वडील रत्नाकर उर्फ काका कलघटगी यांनी 18 वर्षे सारस्वत बँकेचे संचालक म्हणून कार्य केले आहे त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी विकास कलघटगी यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *