पुरस्कार प्राप्त रवींद्र पाटील यांचा शिवबा संघाकडून सत्कार
बेळगाव : गणेश उत्सव हा पवित्र मांगल्याचा व उत्साहाचा सण आहे. तसेच एकोप्याने राहण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. आज तरुणाई समाजात मानप्रतिष्ठा मिळविण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात सत्कार्य करत व्यक्तीमत्वाची समाजाला समोर ओळख निर्माण करायला शिकले पाहिजे. २% अडविण्याऱ्या लोकांच्याकडे कानाडोळा करून चांगले ९८% लोकांसाठी हा सकारात्मक दृष्टीकोन घेवून कार्य करावे. ही बुद्धी सर्वांच्या प्रति असू दे अशी गणरायाकडे प्रार्थना सत्कारमूर्ती सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
कुद्रेमानी जीवनगर येथील श्री शिवबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. यावेळी नुकताच ५ सप्टेंबर शिक्षक दिनी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून चिक्कोडी येथे आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या गावचा सुपुत्राचा सत्कार सभारंभ आयोजित केला. मंडळाचे अध्यक्ष परशराम नागो काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात रवींद्र पाटील यांना आरतीचा मान देवून गणरायाची पुजन करून करण्यात आली. बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या रवींद्र पाटील सरांचा शिवबा गणेशोत्सव मंडळातर्फे अध्यक्ष परशराम काकतकर, उपाध्यक्ष संदिप काकतकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे शिक्षकीपेशा सांभाळत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात सतत वेगवेगळे कार्यात धडपडी अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित आहेत. तंत्रस्नेही शिक्षक म्हणून चंदगड तालुक्यात ओळख निर्माण केली आहे. गेली दोन वर्षे बेळगाव येथे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजन केले. पाटील हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अवलिया बेळगाव – कोल्हापूर जिल्ह्यात लाभलेले आहे. ते पत्रकार, कवी, तंत्रस्नेही शिक्षक, उत्तम निवेदक, समालोचक व कोणत्याही कार्यक्रमाचे चांगले संयोजक करतात. अनेक सामाजिक पदे सांभाळतात यामुळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, असे प्रतिपादन परशराम काकतकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कलाकार मारुती लक्ष्मण मंजूकर, माजी सैनिक गोमाणा सुतार, मल्लाप्पा य. गुरव, संजय भिमराव पाटील, गोपाळ चौगुले व धान्य व्यापारी उत्तम पाटील होते.
यावेळी रवींद्र पाटील यांनी मंडळाला टी शर्ट भेट दिली. शिवबा मंडळाचे अध्यक्ष उमेश पाटील, रवळू गुरव , विनायक पन्हाळकर, हणमंत पन्हाळकर, कडलगेकर, राजू पन्हाळकर व यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजू पन्हाळकर यांनी केले व उमेश पाटील यांनी आभार मानले.