बेळगाव : बेळगावातील पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना “वृषभश्री” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल कर्नाटक जैन अल्पसंख्याक संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्य पातळीचा हा पुरस्कार. मागील अनेक वर्षांपासून कुंतीनाथ कलमनी हे जैन समाजामध्ये समाजसेवा करत आले आहेत. या समाजसेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच बेंगलोरचे डॉ. नीरजा नागेंद्रकुमार यांना “ब्राह्मीश्री” पुरस्कार देण्यात आले आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम दि. १२ रोजी गरग ( धारवाड) येथील श्री जयकीर्ती विद्यालयामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे सानिध्य आचार्य श्री १०८ ज्ञानेश्वर महाराज असतील. याच कार्यक्रमामध्ये बेळगाव विभागीय ९ वा जैन शिक्षक समावेश व श्री ज्ञानेश्वर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
