चिक्कबळापूर – ट्रक आणि जीपची जोरधार धडक होऊन भीषण अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. व दहा जणांना पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकमधील चिक्कबळापूर जिल्ह्यात चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ भीषण अपघात झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच चिंतामणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून बचाव कार्य केले. व जखमींना उपचारासाठी रुगणालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. पोलिसांनी तात्काळ चालकाला अटक केली आहे.
या अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की, जीपची ट्रकला धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचा जागीच चुराडा झाला आहे. जीपमध्ये चालकासह १७ जण प्रवास करत होते त्यापैकी ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त जखमींवर कोलार एसएनआर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमींना बेंगळुरु मधील रुग्नालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीनिवासपुराचे आमदार रमेशकुमार, मलुरचे आमदार के. वाय. नांजे गोवडा आणि चिंतामणीचे आमदार कृष्णा रेड्डी यांनी भेटी दिली आहे.
Check Also
सतीश जारकीहोळी – विजयेंद्र भेटीमुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्य
Spread the love बंगळूर : सत्ताधारी काँग्रेसमधील क्षणिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र …