Sunday , July 21 2024
Breaking News

कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद बेळगाव यांच्यावतीने निदर्शने

Spread the love

बेळगाव : अनुसूचित जातीचा समाजाकरिता देण्यात आलेले अनुदान दुसऱ्या ठिकाणी वापरला जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती वर्गावर अन्याय होत असून हा अनुदान दुसऱ्या ठिकाणी जे वापरत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आज कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद बेळगाव यांच्यावतीने निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता निदर्शने करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आपल्या मागण्या मान्य करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविले.
अनुसूचित जाती जमाती करिता सरकारने एससीएसपी/पीएसपी अनुदान दिला आहे. मात्र या अनुदानाचा गैरवापर करत तो दुसऱ्या ठिकाणी वापरला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, याचबरोबर रोहित चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली पाठ्यपुस्तक समिती रद्द करावी आणि एससी विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये सर्व सेवा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी सदर मागणीचे निवेदन कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद बेळगाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष महांतेश तलवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
याप्रसंगी सिद्धाप्पा कांबळे, शशी साळवे, मल्लेश चौगुले, गौतम पाटील, आर. जी. कांबळे, दुर्गेश कांबळे, नागेश कृष्णा शेट्टी, संतोष कांबळे (बिजगर्णी) यांच्यासहित संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्तीजवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Spread the love  उगारगोळ : हिरेकुंबीजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *