Friday , November 6 2026
Breaking News

डॉ. अमित एस. जाडे यांची राष्ट्रीय सेस्टोबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

Spread the love

बेळगाव : सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंध्र प्रदेश सेस्टोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त पुढील जुलै महिन्यात अनंतपुरम आंध्र प्रदेश येथे आयोजित केल्या जाणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या दुसऱ्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय सेस्टोबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी (टेक्निकल ऑफिसर) म्हणून बेळगावच्या डॉ. अमित एस. जाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाकडून तशा आशयाचे तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्तीचे पत्र नुकतेच डॉ. अमित जाडे यांना मिळाले आहे.
या पद्धतीने डॉ. जाडे यांची सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अनंतपुरम आंध्र प्रदेश येथे येत्या 8 ते 10 जुलै या कालावधीत पुरुष आणि महिलांच्या दुसऱ्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय सेस्टोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. अमित एस. जाडे हे शहरातील गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये सध्या क्रीडा अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. उपरोक्त नियुक्तीबद्दल महाविद्यालयासह स्थानिक क्रीडा क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *