Sunday , July 21 2024
Breaking News

नलवडे विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारे : रमेश कत्ती

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : नलवडे विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारे असल्याचे माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले. ते साई भवन येथे आयोजित अमर नलवडे यांच्या ५० व्या वाढदिवस कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. कार्यक्रमाला दिव्य सानिध्य संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे लाभले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शिवाजी खवने यांनी केले. प्रास्ताविक भाषण गिरीश कुलकर्णी यांनी केले. परिचय ॲड. प्रमोद होसमनी यांनी करुन दिला. श्रीच्या व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची शानदार सुरुवात करण्यात आली. अमर नलवडे यांचा वाढदिवस कार्यक्रम रक्तदान, पालिका सफाई कामगारांना कपडे वाटप, एक हजार वृक्षरोपांचे वाटप, गरीब कुटुंबातील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन साजरा करण्यात आला.
रमेश कत्ती पुढे म्हणाले, गेली सत्तर वर्षे झाली नलवडे घराणे राजकारणात आहे. नलवडेंनी राजकारणातून समाजकारण करतांना कधीच जातीचे, भाषेचे आणि इर्षेचे राजकारण केले नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण केले. नलवडेंची पाचवी पिढी राजकारणात प्रवेश करीत आहे. आताचे राजकारण कमर्शियल झालेले असले तरी अमर नलवडे यांनी आपल्या घराण्याचा निष्ठेचा राजकारणाचा वारसा पुढे चालविला आहे. आमच्या कत्ती परिवाराशी नलवडेंचे नाते भावंडासारखे कायम आहे. घराण्याची तुलना धनदौलतमध्ये करता येत नाही. चांगले संस्कार, चांगल्या आचार-विचारावर घराणे ओळखले जाते. अमर यांचा आजचा ५० वा वाढदिवस त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती देणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी आपल्या आर्शिवचनात म्हणाले, अमर नलवडे यांची विकासाभिमुख कामे लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणारी आहेत. त्यामुळे अमर यांची विकासाभिमुख कामे अमर राहणार आहेत. अमर यांच्या कार्यावर विश्वास ठेवणारी त्यांच्यावर प्रेम करणारी आणि भक्ती असलेला जनसमुदाय वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, अमर यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई एम. नलवडे, पत्नी सौ. सुनेत्रा अमर नलवडे, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अमर नलवडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, चिकोडी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश नेरली, निपाणीचे माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, उत्तम पाटील, सुरेश कुराडे, आर. एम. पाटील, चिकोडीचे माजी नगराध्यक्ष रामा माने, शशीराजे पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, पवन कत्ती, शंकरराव हेगडे, शंकरराव हेगडे, राजेंद्र संसुध्दी, राजेंद्र गड्डेण्णावर, डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. रमेश दोडभंगी, युवानेते पवन कणगली, उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक संजय शिरकोळी, सचिन भोपळे, नंदू मुडशी, रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ, ॲड. प्रमोद होसमनी, ॲड.विक्रम कर्निंग, पवन पाटील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवस कार्यक्रमात शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, नागरिकांनी, चाहत्यांनी उपस्थित राहुन अमर नलवडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आभार जयप्रकाश सावंत यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *