Monday , June 1 2026
Breaking News

अमर तू कत्तींची साथ सोडू नकोस…

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी अमर नलवडे यांना कत्तींची साथ सोडू नकोस असा कानमंत्र दिला आहे. अमर नलवडे यांच्या वाढदिवशी कार्यक्रमात माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले अमर तुला मंत्री उमेश कत्तीं, माजी खासदार रमेश कत्ती यांचे चांगले नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे तू त्यांची साथ सोडू नकोस. आमच्याकडे येण्याचं चुकून देखील करु नकोस. कारण तुझे राजकीय भवितव्य कत्ती बंधुंकडून उज्ज्वल असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले नलवडे यांच्यामुळेच मी प्रथम जिल्हा पंचायत सदस्य आणि नंतर आमदार झालो. राजकारणात मला आणण्याचे कार्य दिवंगत नेते शंकर तात्या नलवडे, मधुअण्णा नलवडे, नारायण तात्या नलवडे यांनी केले आहे. त्यामुळे नलवडे परिवाराचा मी कायम ऋणी आहे.
काकांनी पक्षनिष्ठा गहाण ठेवली..
निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी अमर नलवडे यांना कत्तींची साथ सोडू नकोस असे सांगताना आंमच्याकडे अर्थात काॅंग्रेस पक्षात येऊ नकोस असे सांगून पक्षनिष्ठा गहाण ठेवल्याचे दाखवून दिले आहे.काॅंग्रेस पक्षासाठी झटणारे, काॅंग्रेसचे एकनिष्ठ, पक्षनिष्ठ काका भाजपाच्या नेत्यांची स्तुती करताना आपण काॅंग्रेसचे असल्याचे विसरून गेलेले दिसले. काकांचा राजकारणातील पलटवार राजकीय वर्तुळात निश्चितच चर्चेचा विषय ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

आई आणि मुलाचा संकेश्वरजवळील हिरण्यकेशी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Spread the love  संकेश्वर : आई आणि मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *