Saturday , July 13 2024
Breaking News

मुडलगीतील ते भ्रूण आपलेच : खासगी इस्पितळाची कबुली

Spread the love

बेळगाव : मुडलगीत भरण्यांत घालून नाल्यात टाकलेले ते ७ भ्रूण आपल्याच इस्पितळातील असल्याची कबुली मुडलगी येथील कनकरेड्डी इस्पितळाने दिली असल्याचे समजते.

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथील बसस्थानकाजवळील नाल्यात काल, शुक्रवारी भरण्यात भरून टाकलेले ७ भ्रूण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व भ्रूण ५ महिने पूर्ण झालेले आहेत. जिल्हा आरोग्य खात्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत हे भ्रूण कोण टाकले याचा शोध सुरु केला. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी मुडलगी पोलिसांच्या मदतीने गोकाक आणि मुडलगी शहरातील खासगी इस्पितळ आणि मॅटर्निटी होम्सवर छापे मारले. एका इस्पितळाच्या स्कॅनिंग सेंटरवरही छापा टाकण्यात आला. त्यानंतर आज सकाळी संशयास्पद इस्पितळाना टाळे ठोकण्यात आले. सापडलेले ७ भ्रूण बेळगावातील विधिविज्ञान प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. याठिकाणी भ्रूण चाचणी करून अहवाल दिल्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून बिनदिक्कत भ्रूणलिंग तपासणी करून गर्भपात करण्यात आल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पीओपी गणेशमूर्ती बंदीचा आदेश बेळगावात नको; गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सवानंतर पीओपीच्या गणेश मूर्त्या नद्यामध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे नद्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *