Wednesday , July 24 2024
Breaking News

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आमच्याकडेच दोन तृतीयांश बहुमत : दीपक केसरकर

Spread the love

गुवाहाटी : आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे भासवले जात आहे; परंतु आम्ही सर्वजण आजही शिवसेनेत आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२५) पत्रकरांशी संवाद साधताना केला.

नोटीस पाठवून आम्‍हाला घाबरवले जात आहे

यावेळी केसरकर म्‍हणाले की, नोटीस पाठवून आम्‍हाला घाबरवले जात आहे. आम्‍ही शिवसेनेच आहेत. एकनाथ शिंदेच आमचे गट नेते राहतील. शिवनेनेला कोणीही हॅकजॅक केलेले नाही. शिवसेना काँग्रेस-राष्‍ट्रवादीने हायजॅक केले होते, असेही ते म्‍हणाले. आम्‍ही आमच्‍या मतांवर ठाम आहोत. नोटीस बजावण्‍यात आल्‍या आहेत त्‍याला उत्तर दिले जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. महाराष्‍ट्रात आले पाहिजे असे म्‍हणता. दुसरीकडे शिवसैनिकांना रस्‍त्‍यावर उतरविण्‍याची भाषा करता, असा सवालही त्‍यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष आहेत. शिवसैनिकांनी मोडतोड करू नये. कायद्याचे पालन करावे. महाराष्ट्रात घटनेचे उल्लंघन होत असेल, तर न्यायालयात जाऊ. शिवसैनिकांनी रस्त्यावर येण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही पक्षात विलिन होणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, आम्ही त्यांच्या विचारासोबत आहोत. शिंदे गटाने शिवसेना हायजॅक केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच शिवसेना हायजॅक केली होती, असा आरोप त्यांनी यावेळी केला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीसा बजावल्या आहेत. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उमेदवाराच्या नावावर अनेकजण निवडून येतात. निवडणुकीत पाहू कोणाच्या नावावर मते मागायचे ते. संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही. ते आमचे विधीमंडळाचे नेते नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर का बोलू ? मुख्यमंत्र्यांवर कोणतेही आरोप करत नाही, शिवसेना आम्ही संपवत नाही. आजही शिवसेनेत आहे उद्याही राहू. प्रत्येक वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेससमोर हात पसरावे लागले. सत्तेत आमच्यामुळे आलेत आणि आम्हालाच त्रास देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी यावेळी केला. राजकीय परिस्थिती नीट झाली की आम्ही सर्वजण परत येऊ.
आमची योजना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंद केली. चांगली खाती राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे होती. त्यामुळे आमच्या आमदारांची कामे होत नव्हती. मुख्यमंत्री शिवसेनेकडे असूनही नुकसान मात्र, शिवसेनेचे झाले.
ईडीची कारवाई एक दोघांवर झाली, सगळ्यांवर नाही. चार पाच आमदार सोडले, तर बाकीचे आमदार शेतकरी आहेत. त्यामुळे ईडीच्या भीतीने आम्ही वेगळा गट केला, हा आरोप चुकीचा आहे.

About Belgaum Varta

Check Also

बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

Spread the love  पंढरपूर : राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *