Sunday , September 20 2026
Breaking News

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ६ ठराव मंजूर; बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना

Spread the love

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कायदेशीर लढाई सुरू झाली असून, शिवसेनेने शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवत पुढच्या लढाईच्या दृष्टीने सहा महत्त्वाचे ठराव मंजूर केले. या ठरावानुसार बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने दिले आहेत. बैठकीनंतर बंडखोरांवर संध्याकाळपर्यंत कारवाई होईल, असे संकेत संजय राऊत यांनी दिले. जे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत त्यांची मंत्रिपदे काढण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शक ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केला. तसेच त्यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका जिंकण्याचा विश्वासदेखील राष्ट्रीय कार्यकारिणीने यावेळी व्यक्त केला आहे.

शिवसेनेशी बेईमानी करणार्‍यांवर कारवाई करावी

ठराव क्रमांक पाचमध्ये शिवसेना हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी कधीही प्रतारणा करणार नाही. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हे यापुढेही शिवसेनेचे धोरण राहील, असा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली ते कोणत्याही पदावर असले तरी त्यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला असून, कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अन्य कोणत्याही संघटनेला वापरता येणार नाही

शिवसेनेने ठराव क्रमांक सहामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अन्य कोणत्याही संघटनेला वापरता येणार नाही हे नाव शिवसेनेसोबत राहील. कोणालाही ते वापरता येणार नाही, असा ठराव करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे जास्तच आक्रमक झाले होते. तुम्हाला जर मते मागायचे असतील तर तुमच्या बापाच्या नावावर मागा. आमच्या बापाच्या नावावर मते मागू नका, असा सज्जड इशारा त्यांनी बंडखोरांना दिला.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *