किरणगी येथे चार गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ
अथणी : कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये दिलेल्या आश्वासन प्रमाणे आपण विकास कामे राबवत आहे. आश्वासन देऊन दिशाभूल करणाऱ्यापैकी मी राजकारणी नव्हे. जे बोलतो ते आचरणात आणतो, असे प्रतिपादन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले.
किरणगी (ता. अथणी) येथे तावशी -किरणगी, किरणगी- लक्ष्मीवाडी या 5 कोटी 30 लाख रु. खर्चाच्या रस्ता कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी बोलत होते यावेळी व्यासपीठावर चिकोडी जिल्हा बीजेपी मुख्य सचिव निंगाप्पा कोकले, शिवानंद गोलभावी, चिकोडी जिल्हा बीजेपी उपाध्यक्ष विनायक बागडी, भीमापा चनरेड्डी शिवराज शंकरहट्टी, अर्जुन नाईक, दीपक कोडग, चांगदेव पाटील, बाबू शेट्टी, संजय पाटील उपस्थित होते.
आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, माझ्याकडे कोणती व्यक्ती आली तर त्याचे काम काय आहे याची चौकशी करून त्याच्याकडून कामाच्या तळापर्यंत जाऊन समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करतो. आतापर्यंत कोणालाही मी परत पाठवलेले नाही. कोणाबद्दल कोणत्या प्रकारचा मतभेद नाही सर्व मतदार संघातील व्यक्ती माझे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांची कोणतेही असेल तर मी करण्यास सिद्ध आहे. खोटे बोलून दिशाभूल करणारा मी नव्हे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
अथणी उत्तर भागामध्ये नदीवर बंधारे बांधून त्यामध्ये पाणी साठवण्याचे काम मी केले आहे. त्या पाणी संग्रहामुळे त्या परिसरात विहिरीना बारमाही पाणी येऊन शेतकऱ्यासाठी अनुकूल बनले आहे. त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी खिळेगाव बसवेश्वर पाणीपुरवठा योजना गतीने चालू आहे. मी बोलल्या प्रमाणे ही योजना पूर्ण करूनच दाखवतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
