संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कुंभार गल्लीतील जलवाहिनी फुटल्याने शुध्द पिण्याचे पाणी गटारीतून वाहताना दिसत आहे.पालिकेचे अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी इकडे लक्ष द्यायला तयार नसल्याची तक्रार येथील येथील नागरिकांनी महिलांनी केली आहे. येथील लोकांनी जलवाहिनी दुरुस्तीची मागणी केलेली असली तरी कोणीही याची दखल घ्यायला तयार नसल्याने लोकांतून संताप व्यक्त केला जात आहे. येथील नगरसेविका सौ. संगिता कोळी यांनी जलवाहिनी दुरुस्त करण्याविषयी संबंधितांना सांगितले तरी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आज-उद्यावर हे काम पुढे ढकलत आहेत. कुंभार गल्लीतील जलवाहिनी दुरुस्तीचे काम रखडत राहिल्याने येथील नळधारकांना पुरेसा पाणीपुरवठा होईनासा झाला आहे. जलवाहिनीचे पाणी नळाला कमी आणि गटारीला जादा जात असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे.
दाद ना फिर्याद..
पालिकेचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सांगताहेत. शुध्द पिण्याचे पाणी गटारीला चाललंय तर जाऊदे की, दुरुस्तीचे काम केंव्हा करायचं ते आंम्हाला नका सांगू ! आम्हाला चांगलं ठाऊक आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम कधी हाती करायचे ते. यामुळे येथील लोकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
