Wednesday , May 29 2024
Breaking News

विसर्जन मिरवणूक नाहीच, बाप्पाला निरोप देण्यासाठी पाचच कार्यकर्ते

Spread the love

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी राज्य शासनाने कर्नाटक राज्यातील गणेशोत्सवावर निर्बंध लादले आहेत. दरम्यान कर्नाटक राज्यात पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असताना, बेळगावात यावर्षी दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी परवानगी दिली आहे. दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात रीतसर आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे.
बेळगाव जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला पाच दिवसांऐवजी या वर्षी दहा दिवसांची परवानगी देण्यात आली असतान, इतर नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे, असेही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कळविले आहे.
रविवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी आहे. या दिवशी बाप्पांना निरोप देण्यासाठी कोणत्याही मंडळाला विसर्जन मिरवणुकीची परवानगी देण्यात येणार नाही. बाप्पांना निरोप देण्यासाठी अवघे पाच कार्यकर्ते विसर्जनासाठी जातील. त्याचबरोबर बेळगावातील आठ ठिकाणी असलेल्या विसर्जन तलावापासून काही अंतरावर मंडळाचे कार्यकर्ते श्रीमूर्ती अधिकार्‍यांकडे सुपुर्द करतील. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने विसर्जन तलावात श्रीमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. दरम्यान कोरोनाचे गांभीर्य लक्षात ठेवून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. नियमभंग करणार्‍या विरोधात सक्त कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

हलगा-मच्छे बायपास रस्त्याची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली

Spread the love  बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *