बेळगाव : मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा सहावी ते दहावी शाळा सुरू करून देण्यास परवानगी दिली. त्याचे औचित्य साधून संत मीरा इंग्रजी शाळेत गणहोम करण्यात आले. शाळा सुधारणा समिती सदस्य अनंतराम कल्लुराया व पत्नी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, इन्चार्ज विणाश्री तूक्कार, गीता वर्पे, सुजाता पाटील, आशा कुलकर्णी, चंद्रकांत तुर्केवाडी, यांच्या हस्ते गणहोम, गणेशपूजन, गणअभिषेक, व महाआरती करण्यात आली, भटजी सचिन जोशी यांनी ही विधी केली. याप्रसंगी शाळेतील पहिली ते दहावीचे शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …