बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्या वतीने बालरोगतज्ञ आणि आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांचा शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी डॉ. अनगोळ यांच्या कार्याचा आढावा घेऊन डॉक्टरीपेशा सांभाळत करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती करून दिली.
यावेळी सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. राजश्री अनगोळ यांनी डॉक्टर्स दिनाबद्दल माहिती दिली आणि आपण आपले शरीर सुदृढ राखणे गरजेचे असून आहारविहार आणि व्यायामावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. तसेच सखीच्या प्रत्येक सदस्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करून आपला आहार कसा असावा आणि तो कसा घ्यावा यांच्याबद्दल विस्तृत माहिती दिली.
यावेळी अध्यक्षा चंद्रा चोपडे आणि माजी अध्यक्षा निता पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी अध्यक्षा निता पाटील, फेडरेशन संचालिका नम्रता महागावकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत,.अर्पणा पाटील, ज्योती पवार, ज्योती सांगुकर, सुर्वणा काळे, राजश्री हसबे, सुजाता देसूरकर, वृषाली मोरे, वैशाली भातकांडे, अर्चना कंग्राळकर, प्राची होनगेकर, मंजिरी पाटील, गौरी गोठीवरेकर, शितल पाटील, दिपा पाटील, सविता मोरे, दिपा मुतकेकर, वरदा आंगडी, भाग्यश्री पवार, रेणू भोसले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलक्षणा शिनोळकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta