
बेळगाव : बेळगावच्या शहराच्या दक्षिण भागात श्रीराम सेना हिंदुस्तानच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधक मेगा लसीकरण मोहिमेस रविवारी सकाळी प्रारंभ झाला.
रविवारी सकाळी शहापूर भागातल्या विविध भागातून वडगाव, अनगोळ परिसरात असे एकूण 40 ठिकाणी डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीलाच सकाळी वयोवृद्ध नागरिक, महिला, बालक आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेस प्रतिसाद दिला. त्यामुळे शिबीराच्या ठिकाणी मोठी गर्दी दिसत होती. तर गल्लीतील घराघरात जाऊन देखील कार्यकर्ते लसीकरण करत आहेत.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी विविध ठिकाणी चाललेल्या लसीकरण शिबिराच्या स्थळी भेट देऊन मोहिमेस चालना देण्यात आली. पावसाळ्याच्या सुरुवातीला वडगाव भागामध्ये विशेष करून दक्षिण भागात डासांचा प्रादुर्भाव अधिक असतो त्यामुळे मोठा पाऊस येईपर्यंत साथीचा रोग होण्याची शक्यता असते यासाठी काळजी म्हणून श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेने लसीकरण शिबिर आयोजित केले आहे.
रविवारचा दिवस सुट्टीचा असल्याने बहुतांश लोक घरीच असतात त्यामुळे सर्व जण चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या लसीचा लाभ घेऊ शकतात यासाठी हे शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले आहे. बेळगाव दक्षिण भागातील विविध ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले. गल्लीतील श्रीराम सेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन देखील अनेक ठिकाणी लोकांना लस देण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta