Tuesday , October 15 2024
Breaking News

बेळगावात 17 सप्टेंबर रोजी तीन लाख जणांना लसीकरण

Spread the love

बेळगाव : कर्नाटक सरकारतर्फे येत्या शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी विशेष राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार असून या एका दिवसात 25 ते 30 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
या विशेष राज्यव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 3 लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 10 लाख लोकांचे पहिले लसीकरण अद्याप प्रलंबित आहे. यासाठी राज्यव्यापी मोहिमेमध्ये खाजगी हॉस्पिटल्सना देखील सामावून घेण्यात आले असून या हॉस्पिटल्समध्ये 17 सप्टेंबर रोजी सर्वांना मोफत लस उपलब्ध असणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचे आवश्यक डोस त्या दिवशी आरोग्य खात्याकडून खाजगी हॉस्पिटल्सना पुरविले जातील. खाजगी हॉस्पिटल्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी त्यांच्याकडून साधारण 500 ते 1500 पर्यंत डोस दिले जाऊ शकतात.
राजव्यापी लसीकरण मोहिमेचा पूर्वतयारीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मागील वेळी बेळगावने 1 लाखाचा टप्पा पार केला होता, आता यावेळी 3 लाखापर्यंत डोस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. सदर उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व ती तयारी करण्याची सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिली. शहरी भागात 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्याच प्रकारची व्यवस्था ग्रामीण भागातही करण्याची तयारी सुरू आहे. कोरोना प्रतिबंधक लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय भवन आणि सर्व सरकारी हॉस्पिटल्सना पुरवली जाईल असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण व शहरी भागातील लोकांसाठी प्रभाग पातळीवर लसीकरण केंद्रे उपलब्ध केली जातील. त्यामुळे नागरिकांनी आपल्या पार्षदांच्या संपर्कात राहावे. प्रत्येक प्रभागांमध्ये एक किंवा त्याहून जास्त लसीकरण शिबिर घेतली जातील. या लसीकरण केंद्र/शिबिरांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असेही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण

Spread the love  बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *