बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हलकी क्रॉसजवळ आज शुक्रवारी सकाळी 2 बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सुदैवानेच या अपघातात मोठी प्राणहानी झाली नाही. मात्र चालकासह 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातात कारचा दर्शनी भागाचा चुरडा झाला असून सुदैवाने कोणताही प्राणहानी झालेली नाही. मात्र झालेल्या अपघातात बस चालक जखमी झाला आहे.
भरधाव वेगाने असणाऱ्या या दोन्ही केएसआरटीसीच्या बसेसचा वेगाचा अंदाज दोन्ही चालकांना आला नसल्याने ते एकमेकांसमोर धडकल्याने हा अपघात घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले.