Saturday , December 13 2025
Breaking News

बेळगाव बिम्स प्रगतीच्या पथावर

Spread the love

आमदार अनिल बेनके यांच्या सतत प्रयत्नातून बिम्स हायटेक आणि सुंदर
बेळगांव : बेळगांव उत्तर मतदारसंघाचा दिवसागनी कायापालट होत आहे. एकीकडे विकासकामे तर दुसरीकडे जनतेच्या सातत्याने संपर्कात राहुन जनतेची सर्व कामे करणे हा सारा समतोल राखत बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी शहराला हायटेक सिटी बनविण्याचा ध्यास घेतला आहे. आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातुन आजवर बेळगांव शहरात अनेक विकासकामे करण्यात आली आहेत.
बेळगांव शहराचा विकास झपाट्याने होत चालला आहे मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी वेगाने कामकाज पार पाडण्यात येत आहेत. सरकारी संस्थाना हायटेक टच देण्यात येत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बेळगांव जिल्हा रुग्णालय अर्थात बिम्स केवल खासगी रुग्णालयात वेगवान आणि उत्तम सुविधा मिळतात ही बाब जिल्हा रुग्णालयाने फोल ठरविली आहे. बेळगांव शहरातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात सेवा पुरविण्यासाठी उभा असलेल्या रुग्णालयात खाजगी रुग्णालयाच्या बरोबरीने सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विकासासोबत सामाजिक व वैद्यकिय क्षेत्रामध्ये जनतेला उपयोग व्हावा आशा कामांनासुद्धा जास्तीत जास्त भर दिली आहे. मुखत: कुंदानगर येथे स्मार्ट सिटीची कामे असो, मुलभुत सुविधा असो, सरकारी संस्थांचे नविकरण तसेच बेळगांव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये जी हायटेक यंत्रोपकरण सुविधा मिळते ती आता बेळगांवच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार, वैद्यकिय विभाग आणि आमदार अनिल बेनके यांच्या विषेश काळजीमुळे आज बेळगांव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी नविकरण केलेल्या पिडीयाट्रिक वॉर्ड, अंगविकल रोगींसाठी वेगळे काउंटर, वैद्यकिय शिक्षण घेणार्‍या गरजु विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण यांचा समावेश आहे. अशी बरीच कामे आमदार अनिल बेनके यांच्या इच्छाशक्तीने तसेच आमदार निधीतुन मिळालेल्या अनुदानातून पार पडत आहेत. लहान मुलांना चिकित्सा जितकी महत्वाची आहे तितकेच महत्वाची रुग्णालयातील व्यवस्थाही आहे. ही बाब लक्षात घेवुन आमदारांनी बालविभागात मुलांचे लक्ष वेधण्यासाठी आकर्षक सजावट केली आहे. शिवाय पोषक आहाराचीही व्यवस्था केली आहे. लहान मुलांना आवडेल आणि भावेल असा हायटेक कायापालट केला आहे.
जिल्हा रुग्णालयातील सुविधांसोबतच आणखी एक विशेष कार्य देखील आमदारांनी हाती घेतले आहे. जिल्हा रुग्णालयात काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी शिशुविहार केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्राचे उद्घाटन 08 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा विभागदेखील हायटेक पद्धतीने सुसज्जित करण्यात आला आहे. त्याशिवाय पडदे, उशी, बेडशीट याही लहान मुलांच्या खेळण्याप्रमाणेच रंगीबेरंगी ठेवण्यात आले आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय याठिकाणी मुलांची सोय केली जाते. 6 महिने ते 6 वर्षे या वयोगटातील मुले या विभागात दाखल केली जावु शकतात. डॉक्टर ते स्वच्छता कर्मचारी या सर्वांच्या मुलांच्या व्यवस्थेचा तसेच आहाराच्या सुविधेसह या विभागात केली जाते. आणि या सार्‍यासाठी आमदार अनिल बेनके यांचे प्रयत्न खुप मोलाचे आहेत. यासह जनतेच्या हितासाठी हाती घेतलेल्या अनेक सरकारी कामकाजाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सर्व विकासकामांसोबतच सहाय्यवाणी केंद्र, ऑनलाईन पेयमेंट व्यवस्था करण्यात आली आहे. देशात बारावा नंबर हा आपल्या बिम्स इस्पितळाचा लागतो या ठिकाणी रुग्णांकरिता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून बेळगांव व सिव्हिल हॉस्पिटल विकासापासुन वंचित होते. आमदार अनिल बेनके यांच्या सतत प्रयत्नाने आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हायटेक व्यवस्था उपलब्ध आहे, स्वच्छतेसाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे तसेच हायटेक यंत्रोपकरणाने उपचार होत आहे. याप्रमाणे जनतेनेसुद्धा आमदारांची साथ देवुन त्यांनी करत असलेल्या कामांबद्दल प्रशंसा केली आहे. तसेच बिम्सचे प्रशासकीय संचालक आदित्य आमलन बिस्वास हे या प्रकरणी जातीने लक्ष घालत असून बिम्स हॉस्पिटल हे देशात पाचव्या क्रमांकावर असेल अशी आशा आमदार अनिल बेनके यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी व्यक्त केली आहे.
यावेळी उद्घाटनाप्रसंगी बिम्सचे संचालक आदित्य आमलन बिस्वास, बेळगांव उत्तरचे आमदार अनिल बेनके, नगरसेवक मुरगेंद्रगौडा पाटील, श्रेयस नाकाडी, प्रवीण पाटील यांच्यासह बिम्सचे कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांच्यासह नागरिक देखील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *