बेळगाव : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल शहरात पाहणी दौरा करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक पंचांशी संवाद साधला.
गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल बुधवारी सायंकाळी शहरातील चव्हाट गल्ली, खडक गल्ली, जालगार गल्ली, भडकल गल्ली व दरबार गल्ली परिसराचा पाहणी दौरा केला.
या पाहणी दौर्यात दरम्यान पोलीस उपायुक्तांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक पंचांची संवाद साधून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या. तसेच कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही केले.
पोलीस उपायुक्त डॉ. आमटे यांच्या या पाहणी दौर्यात दरम्यान त्यांच्या समवेत मार्केट एसीपी सदाशिव कट्टीमणी, सीपीआय तुळशीदास मल्लिकार्जुन, खडेबाजार एसीपी चंद्रप्पा व सीपीआय निंबाळकर यांच्यासह लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे सुनील जाधव, संजीव नाईक, विजय जाधव आदी उपस्थित होते.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …